राष्ट्रवादीच्या व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांना पुन्हा संधी…

2

सावंतवाडी,ता.१९: राष्ट्रवादीच्या व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची आज पुन्हा एकदा निवड करण्यात आली. त्यांचे गेल्या काही दिवसाचे संघटनेतील काम पाहून त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असे सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सांगितले. आज येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना फेरनिवडीचे पत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रांतिक सदस्य काका कुडाळकर, हिदायतुल्ला खान, देवेंद्र टेंबकर, शैलेश लाड, नवल साटेलकर, राजू धारपावर, इफ्तिकार राजगुरू, शफीक खान, दर्शना बाबर-देसाई , सावली पाटकर, अस्मिता वाढोकार, रिया भांबुरे आदी उपस्थित होते.

78

4