गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना वेंगुर्ल्यातील एक ताब्यात…

2

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई; साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.१९: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने वेंगुर्ला येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (रा.वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज कोंडुरे-निरवडे मार्गावर करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज दोन ठिकाणी कारवाई केली. यातील एक कारवाई कोंडुरे तर दुसरी कारवाई कोल्हापूर करवीर येथील चिंचवड परिसरात करण्यात आली. या कारवाईत सुद्धा चार चाकी सह तीन लाख आठ हजाराची दारू मिळून एकूण नऊ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या प्रकरणी सुजय कन्हैया छेडा व शंकर विष्णूमल वाणी दोघे रा.कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. दरम्यान पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे व निरीक्षक पी. आर. पाटील करीत आहेत.

1,492

4