देवगड समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन ट्राॅलर्सवर कारवाई…

2

देवगड,ता.१९: येथील समुद्रात १५ वाव पाण्यातील प्रतिबंध क्षेत्रात प्रवेश करून मासेमारी करणार्‍या कर्नाटक येथील ‘स्वर्णहनुमा’ व ‘फोरस्टार’ या दोन ट्रॉलर्सना देवगड मत्स विभागाने दणका दिला. ही कारवाई आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमध्ये मत्स्य परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासमवेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक प्रथमेश चव्हाण, सागरी सुरक्षा रक्षक हरेशवर खवळे, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर, श्री. ठुकरुल सहभागी झाले होते. पकडण्यात आलेल्या या बोटीवर गळ फिशिंगची जाळी आढळून आली. तसेच बोटीवरील खलाशांचा विमा नव्हता. तसेच या बोटींना महाराष्ट्र जलधी प्रतिबंध क्षेत्रात मासेमारीचा परवाना नसताना या बोटी अनधिकृत प्रवेश करून मासेमारी करीत असताना मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेने पकडले. या बोटीवरील मिळालेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. बुधवारी या बोटीवर कारवाई करण्यासंदर्भात अभिनिर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती श्री. मालवणकर यांनी दिली.

337

4