सावंतवाडीत गटाराचे काम नागरिकांनी रोखले

392
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.२६ : येथील माठेवाडा परिसरात माजी नगरसेवक असलेल्या ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या गटाराच्या कामात जुन्या सिमेंटच्या फरश्या बसविण्यात आल्यामुळे नागरिक आणि ठेकेदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.हा प्रकार आज सकाळी दहा वाजता घडला. संबंधित ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक देवा टेमकर व नागरीकांनी  हे काम रोखून धरण्याचा इशारा दिला.
अखेर त्या ठिकाणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सुद्धा संबंधित  ठेकेदाराला धारेवर धरले, कामात कोणतीही त्रुटी न ठेवता काम पूर्ण करा, जुन्या फरश्या बसवू  नका अशा सूचना केल्या. तर आपण त्या फरश्या मापे घेण्यासाठी आणल्या होत्या असे सांगून ठेकेदाराने लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु मापे घेण्यासाठी सर्व फरश्या लावण्याची गरज काय असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला. अखेर आपण काम करून देतो असा शब्द ठेकेदाराकडून देण्यात आला.
संबंधित ठेकेदार हा त्याच परिसरात राहणारा असून माजी नगरसेवक आहे. त्यामुळे त्याच्याकडूनच चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारे काम होतं असेल दुर्दैवी आहे अशी नाराजी श्री टेमकर यांनी  व्यक्त केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत, प्रकाश उपरकर, संजय नाईक, प्रशांत पाटणकर, बाळ पुराणिक, शेखर प्रसादी व स्वाभिमान पक्षाचे युवा शहर उपाध्यक्ष कुणाल सावंत आदी उपस्थित होते.