नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सावंतवाडीत स्वच्छता मोहीम

2

सावंतवाडी ता.२६ :  येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने भटवाडी परिसरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी तब्बल पाच टन गाळ व कचरा जमा करण्यात आला.
या मोहिमेत प्रतिष्ठानच्या २०० सदस्यासमवेत नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी सहभागी झाले होते.
येथील भटवाडी परिसरातील ब्राह्मण देवालय परिसर, विहीर आदीची स्वच्छता तसेच अन्य काही भाग यावेळी साफ करण्यात आला.  सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली.यावेळी नागरीक कुणाल श्रृंगारे, अभिनंदन राणे, रघुनाथ धारणकर, संजय सावंत, उमेश मोरे, विजय सावंत, गौरव रामाणे, संदेश मोरे, चंदन नाईक,भार्गव धारणकर, दत्तगुरु मोरगे उल्हास सावंत, शेखर शिंदे,उमेश परब आधी सदस्य सहभागी झाले होते. उपस्थित सदस्यांचे आभार शृंगारे यांनी मानले.

0

4