आयनल येथे गळफास लावून तरूणाची आत्‍महत्‍या…

2

कणकवली, ता.२१ : तालुक्यातील आयनल रोहिलेवाडी येथील महेश रामचंद्र वायगंणकर (वय ५२) याने आज दोरीने गळफास लावत आत्महत्या केली. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. एकटेपणाला कंटाळून त्‍याने राहत्‍या घराच्या पडवीत आत्‍महत्‍या केल्‍याची शक्‍यता स्थानिकांनी व्यक्‍त केली.

महेश वायंगणकर हा अविवाहीत होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास त्‍याच्या वहिनीला पडवीत गळफास लावलेल्‍या स्थितीत दिसून आला. तिने ही बाब आपल्‍या पतीला सांगितली. त्‍यांनतर तातडीने पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. महेश वायगंणकर यांचा मृतदेह पंचनामा करत शवविच्छेदन करून पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याघटनेची खबर महेश याचा चुलत भाऊ यशवंत कृष्णा वायगंणकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

385

4