पाट येथील महिलेचा मृतदेह आढळला शेत विहिरीत….

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ, ता.२२: पाट परबवाडी येथील महिलेचा मृतदेह घराजवळील शेत विहीरीत आढळून आला आहे.आरती आत्माराम परब (५०) असे तिचे नाव आहे.आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी निवती पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाट वरचीवाडी येथील आरती परब हिचा मृतदेह त्यांच्या घराजवळील शेत विहीरीत गुरूवारी सकाळी दिसुन आला.येथील रमेश परब यांनी पोलिसात खबर दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निवती जी. व्ही. वारंग यांनी जात पंचनामा केला. अधिक तपास पो. हवालदार पाटकर करीत आहेत.

\