सावरवाड चेकपोस्ट नजीकच्या वटवृक्षास आग ; वाहतूक विस्कळीत…

2

 

सिंधुदुर्गनगरी, ता.२६: मालवण-कसाल राज्य मार्गावरील सावरवाड चेक पोस्ट इमारत नजीक असलेल्या वडाला आग लागली आहे. त्यामुळे वड अर्धा जळून रस्त्यावर पडला आहे. तर अजून अर्धे झाड जळत असून ते कधीही रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली आहे. सार्वजनिक बांधकाम बेपत्ता झाल्याने वाहन चालकांनी स्वतःच पर्यायी मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचाही पत्ता नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान आग विझविण्यासाठी मालवण पालिकेचा बंब घटनास्थळी रवाना झाल्याची माहीती आरोग्य सभापती पंकज सादये यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जळत असलेल्या वड तोडून बाजूला करावा अशी मागणी होत आहे. सायंकाळी ५ वा. कोणीतरी लावलेल्या आगीत या वादाने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

4

4