Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeआंतरराष्ट्रीयमोदींचा शपथविधी ३० मे रोजी...

मोदींचा शपथविधी ३० मे रोजी…

 

नवी दिल्ली, ता.२६ : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ३० मेला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेणार असून राष्ट्रपती भवनात सायंकाळी सात वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या राष्ट्रपती भवनात सुरू असून या सोहळ्यास तीन हजारहून अधिक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments