तापसरीच्या आजाराने कणकवलीत महिलेचा मृत्यू…

2

 

कणकवली, ता.26 : शहरातील कनकनगर येथील रहिवासी मधुरा लीलाधर सावंत (वय 32) यांचा आज सायंकाळी चारच्या सुमारास तापसरीने मृत्यू झाला. गेले दोन दिवस त्यांच्यावर तापसरीचे उपचार सुरू होते. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना दुपारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुुफ्फुस निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता रुग्णालयातून व्यक्त करण्यात आली. मधुरा यांचे पती लीलाधर सावंत हे भारतीय सैन्य दलात सेवा बजावत आहेत. मधुरा सावंत यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी.एम.सावंत यांच्या त्या सून होत्या. मधुरा यांच्या पश्‍चात मुलगा, पती, सासू-सासरे, दीर असा परिवार आहे.

11

4