सापा§सोबत टीक-टॉक करणे आले अंगलट

2

दोघे सर्पमित्र अडचणीत : वनविभागाकडून कारवाई

मुंबई, ता. 26 : विषारी व भयावह सापांसमवेत टिक-टॉक करण्याचा प्रयत्न करणारे डोंबिवली येथील दोघे सर्पमित्र अडचणीत आले आहेत.
काही दिवसापूर्वी त्यांनी सापाचे चुंबन घेताना व्हिडीओ तयार केले होते. काही लहान मुलांनाही विषारी सापाचे चुंबन घेण्यास लावले होते. हे स्टंट टिक-टॉकवर व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ पाहून परिसरातील प्राणीमित्रांनी त्यांचा शोध घेवून याची माहिती वन अधिकार्‍यांना दिली. त्यानुसार वनअधिकार्‍यांनी व्हिडीओच्या आधारे दोघांवर कारवाई केली आहे. यातील एक युवक हा अल्पवयीन असल्याचे समजते. त्या दोघांच्या मोबाईलमध्ये अशाप्रकारे सापांसोबत जीवघेणे व्हिडीओ असल्याचे वन अधिकारी कल्पना वाघेरे यांनी सांगितले.

4