चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या संत रविदास भवनाचे भूमीपूजन ३१ ऑक्टोबरला…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.२७: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवनाचा भूमीपूजन सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार आहे. संत रविदास भवनाचे प्राथमिक टप्प्यातील काम हे आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे.
भूमीपूजन कार्यक्रम आमदार वैभव नाईक यांचे हस्ते करण्यात येणार असून खासदार विनायक राऊत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे,कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव,हुमरमळा सरपंच जान्हवी पालव,उपसरपंच सुरेंद्र राणे,मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय चव्हाण,ऍड.अनिल निरवडेकर,सर्व माजी पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण व समस्त कार्यकारिणीने केले आहे.

164

4