सुसज्ज गस्तीनौकेचे उद्या लोकार्पण : आमदार नीतेश राणेंनी दिलेला शब्द पाळला…

158
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २७ : जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील हायस्पीड, एलईडी ट्रॉलर्सची होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला स्वखर्चातून सुसज्ज गस्तीनौका उपलब्ध करून दिली. या गस्तीनौकेचे लोकार्पण उद्या सायंकाळी पाच वाजता बंदर जेटी येथे होणार आहे.
आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत ही गस्तीनौका मत्स्य व्यवसाय विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे. जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदा मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असताना शासनाकडे अत्याधुनिक गस्तीनौका नसल्याने घुसखोरी करणाऱ्या ट्रॉलर्सला पकडणे मुश्किल बनले होते. मत्स्यव्यवसाय विभागाकडे असलेल्या गस्तीनौका या कुचकामी असल्याने कडक कारवाई होत नसल्याचे दिसून येत होते. मात्र ही बाब आमदार नीतेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून सुसज्ज गस्तीनौका उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला होता. २१ रोजी दांडी येथे झालेल्या मच्छीमार एल्गार मेळाव्याच्या दिवशी ही गस्तीनौका त्यांनी उपलब्ध करून दिली. उद्या या गस्तीनौकेचे लोकार्पण आमदार राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास मच्छीमारांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

\