कोळंब पुलावरून मोटार वाहतूक सुरू…

2

मालवण, ता. २७ : गेले दीड वर्ष कोळंब पुलावरून चारचाकी वाहनांसाठी बंद असलेली वाहतूक आज सायंकाळपासून सुरू झाली. काही दिवसांपूर्वी दुचाकी, रिक्षांची वाहतूक सुरू झाली होती. आता मोटार वाहतूक सुरू झाली असून अवजड वाहनांची वाहतूक केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.
कोळंब पूल दुरूस्तीच्या विषयावरून वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. कोळंब पुलाची दुरुस्तीचे काम जसे पूर्ण होत आहे त्यानुसार गाड्यांची वाहतूक सुरू होत आहे. मात्र अद्याप अवजड वाहतुकीबाबत निर्णय झालेला नाही. यामुळे एसटी वाहतूकही या मार्गावरील बंदच आहे. आता मोटारची वाहतूक सुरू झाल्याने वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान कोळंब पूल संघर्ष समितीने यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी प्रदीप पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी विजय नेमळेकर, प्रमोद कांडरकर, बा. स. लाड, आबा ढोलम यांनी भेट घेतली होती. यावेळी मोटारची वाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सायंकाळपासून ही वाहतूक सुरू झाल्याचे दिसून आले.

4