साग लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी चंदगड येथील एकावर गुन्हा दाखल…

2

साळगाव येथे कारवाई; वाहतूकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनासह लाकूड जप्त…

कुडाळ, ता.२८: तालुक्यातील साळगांव येथे साग इमारती लाकडाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कुडाळ वनविभागच्यावतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी इम्तियाज दस्तगीर मुजावर रा.चंदगड जि.कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहन व साग इमारती लाकूड नग ११९/ ५१९ घनफुट माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास टाटा मॉडेल २५१५ इक्स वाहन क्रमांक केए २८/८९८१ या कर्नाटक राज्यातील वाहनामधून साळगाव येथुन बेळगांवकडे साग इमारती लाकडाची विनापरवाना वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने अटकाव करत तपासणी ट्रकची तपासणी केली असता अवैध साग इमारती नग ११९/ ५१९ घनफुट माल आढळून आला. याप्रकरणी इम्तियाज दस्तगीर मुजावर रा. चंदगड जि. कोल्हापूर याचेवर वनोपज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२ब), महाराष्ट्र वन नियमवाली २०१४ चे नियम ३१, ८२ चे उल्लंघन केलेने गुन्हा नोंद करणेत आला असून वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहन व साग इमारती लाकूड माल जप्त करण्यात आल्याची माहिती कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली. अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने धडक कारवाई सुरू केली असून असा अवैध प्रकार दिसून आल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहनही करण्यात आले. अधिक तपास वनविभाग करत आहे.

558

4