लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सर्वसामान्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे…

2

दीपक कांबळे; शासकीय अधिकार्‍यांकडून लाच मागण्याचे प्रकार वाढले, व्यक्त केली खंत…

बांदा, ता. २८ : शासकीय अधिकाऱ्यांकडून लाच मागण्याचे प्रकार हे वाढले आहेत. आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सर्वसामान्यांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी येथे केले.
बांदा ग्रामपंचायत सभागृहात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात कांबळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निरीक्षक नितीन कुंभार, सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामविस्तार अधिकारी श्री ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

103

4