स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत रांगोळी स्पर्धा…

2

कणकवली, ता.२८ : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत अंतर्गत कणकवली नगरपंचायतीच्यावतीने खुली रांगोळी स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत नगरवाचनालय हॉल येथे होईल. रांगोळीचे सादरीकरण करण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला चार बाय चार फुटाची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

रांगोळी स्पर्धेसाठी माझी वसुंधरा (पर्यावरण संवर्धन), आझादी का अमृत मोहत्सव, स्वच्छ भारत अभियान ( स्वच्छते विषयी ) असे विषय आहेत. तर

१ नोव्हेंबर पर्यंत नगरपंचायत कार्यालय आरोग्य विभाग येथे स्पर्धकांनी आपली नावनोंदणी करावयाची आहे. त्‍यासाठी 8421986069 हा संपर्क क्रमांक आहे. ही स्पर्धा कणकवली शहर मर्यादित होणार आहे. जागा मर्यादीत असल्‍याने प्रथम येणाऱ्याला स्पर्धकाला प्रथम प्राधान्य असणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ३ हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक २ हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक १ हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

31

4