दिलीप पांढरपट्टे यांचे राजन तेली यांना आश्वासन
सावंतवाडी, ता. २७ : सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या विविध समस्यांबाबत लवकरच आपण बैठक घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. दरम्यान विलवडे भालावल येथील पाणीटंचाईवर तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच घरांना पडलेल्या भेगांची भरपाई आणि वीज प्रश्न सोडविण्याबाबत ही आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग, धनगर समाजबांधव राजेंद्र लांबर, लक्ष्मण गावडे ,जानू पाटील, सीताराम लांबर, सखाराम झोरे, महेश काळे पदाधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, वीज मंडळाचे अधिकारी आदींची भेट घेऊन चर्चा केली.
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांची राजन तेली यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी विलवडे भालावल येथील धनगर वस्तीवरील पाणीटंचाईचा प्रश्न तात्काळ निकाली लावण्यासाठी विधंन विहीर खाेदाई केली जाईल. विज प्रश्नी ट्रान्सफरमरला मंजुरी दिली जाईल व पाणी टंचाई आराखड्याला मंजुरी देतानाच घराना भेगा पडल्याची पाहणी करुन भरपाई देण्याचे आश्वासन देत तहसिलदारांना आदेश दिले.
विलवडे -भालावल धनगरवाडीला पीण्याचे पाणी, विज प्रश्न व भुसुरुंग स्फाेटाने घराना भेगा प्रश्नी जिल्हाधीकारी यांच्याशी उद्या मंगळवारी बैठक घेवुन चचाेॅ करण्याची ग्वाही भाजपा प्रदेश चीटणीस राजन तेली यांनी दिली. त्यानुसार ही भेट हाेती. तसेच तात्पुरता पाणी पुरवठा करण्यात येत आहे असे राजन तेली म्हणाले.
विलवडे नजीकच्या दगडखाणीत होणाऱ्या भूसुरुंग स्फोटातमुळे घरांची झालेली नुकसान भरपाई बाबत आश्वासन देण्यात आले.विलवडे- भालावल सुमारे १८६ लाेकवस्ती या गावात आहे. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील सर्व धनगर वस्त्यांवर वीज, पाणी, रस्ते अशा पायाभूत सुविधांबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावा अशी मागणी राजन तेली यांनी केली.
आपण सर्व खात्यांच्या प्रमुखांना आणि धनगर वस्तीवरील लोकांना एकत्रित बैठक घेऊन विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक घेत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले असे राजन तेली म्हणाले.