वेंगुर्ले तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.९० टक्के…

2

शिरोडा कनिष्ट महाविद्यालयाची मनाली पणशिकर ९२.९२ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम…

वेंगुर्ले ता.२८: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेसाठी वेंगुर्ले तालुक्यातून चार केंद्रामधून ८७४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८१२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९२.९० टक्के लागला आहे. शिरोडा बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनाली दिलीप पणशिकर हिने ९२.९२ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर ९७.५४ टक्के असा सर्वाधिक निकाल तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या प्रशालेचा लागला आहे. विशेष म्हणजे यावेळीही तालुक्यात मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान पाटकर हायस्कुलची वाणिज्य शाखेची धनश्री प्रमोद भोवर (८७.८४ टक्के) तालुक्यात व्दितीय, शिरोडा क. महाविद्यालयाची व्यावसायीक अभ्यासक्रमातील दिव्या दशरथ राणे (८६.३१ टक्के) तृतिय आली आहे. तालुक्यातील प्रत्येक केंद्रनिहाय निकाल पुढील प्रमाणे
वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयाचा ८९.०७ टक्के निकाल
वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयाचा ८९.०७ टक्के निकाल लागला आहे. या महाविद्यालयातून २९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयाचा विज्ञान विभाग शाखेचे १०० पैकी  ९९ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९९ टक्के लागला. या शाखेत प्रथम दिपदर्शन अर्जुन सावंत ४८० गुण (७३.८४ टक्के),द्वितीय आरती प्रसाद गावडे ४७९ गुण (७३.६९ टक्के), तृतीय भक्ती चंद्रसेन वेंगुर्लेकर ४७८ गुण (७३.५३). कला शाखेचा ८१.३५ टक्के निकाल लागला या शाखेत ५९ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्रथम गौरी गजानन मांजरेकर ५०३ गुण (७७.३८ टक्के)द्वितीय संजना संजय दामले ४८४ गुण (७४.४६ टक्के) तर  तृतीय सायली अनिल परब ४७३ गुण (७२.७६ टक्के). वाणिज्य विभागाचा ९५.३४ टक्के निकाल लागला या विभागातून ८६ पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्रथम लविना जॉन्सन डिसोझा  ५२१ गुण (८०.१५ टक्के)द्वितीय शिवानी नारायण प्रभु खानोलकर ५०० गुण (७६.९२ टक्के) तर तृतीय पूजा तुकाराम परब ४९९ गुण (७६.७६टक्के) व्यवसाय अ•यासक्रम शाखेचा निकाल ६९.५६ टक्के लागला या विभागात ४८पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून प्रथम अभिजीत नारायण फटजी ४८२ गुण (७४.१५ टक्के)द्वितीय
मैथिली भालचंद्र हळदणकर ४६८ गुण (७२ .००टक्के)तर तृतीय काजल विठ्ठल परब हिने ४५० (६९.२३ टक्के) गुण मिळाले आहेत.
श्री. देवी सातेरी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेचा ९७.५४ टक्के निकाल
श्री. देवी सातेरी हायस्कूल व कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या प्रशालेतून परीक्षेला बसलेल्या १२२ विद्यार्थ्यांमधून ११९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या महाविद्यालयाचा ९७.५४ टक्के निकाल लागला.या महाविद्यालयात कला शाखेतून प्रथम प्रेरणा महादेव परब ४६० गुण  (७०.७६टक्के), द्वितीय आरती विलास परब ४३४ गुण (६६.७६ टक्के) तर तृतीय प्रतीक्षा बुधाजी धरणे ४०६ गुण(६२.४६टक्के) मिळाले. वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला .या शाखेत प्रथम काजल दिलीप गडेकर ५५८ गुण(८५.८४ टक्के) द्वितीय तन्वी हरिश्चंद्र जामदार ५५३ गुण (८५.०७ टक्के)तर तृतीय आत्माराम गुरुनाथ धुरी ५५० गुण (८४.६१टक्के)मिळाले.तर स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला. या शाखेत प्रथम वै•ावी प्रदीप लाड ५२७ गुण (८१.०७टक्के) द्वितीय तन्वी सिताराम मिशाळे ४६७ गुण (७१.८४टक्के) तर तृतीय अच्युत संदेश राऊळ ४६२ गुण(७१.०७ टक्के)गुण मिळाले.
पाटकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा ९३.१६ टक्के निकाल
पाटकर हायस्कूल आणि  रा. सी. रेगे ज्युनियर कॉलेज वेंगुर्ले या प्रशालेतून परीक्षेला बसलेल्या ११७ विद्यार्थ्यांमधून १०९ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९३.१६ टक्के निकाल लागला. या विद्यालयातून कला शाखा निकाल ८३.३३ टक्के लागला. या शाखेतून २४ पैकी २० विद्यार्थी उतीर्ण झाले. त्यामध्ये प्रथम मयुरी संतोष वेंगुर्लेकर ४८४ गुण (७४.४६ टक्के, व्दितीय कविता कृष्णा पेडणेकर  ३७४ गुण (५७,५३ टक्के) तर तृतीय रेश्मा परशुराम सातार्डेकर ३७२ गुण (५७.२३ टक्के). वाणिज्य शाखेचा निकाल ९५.४५ टक्के निकाल लागला. या शाखेतून ६६ पैकी ६३ विद्यार्थी उतीर्ण झाले. या विभागात प्रथम धनश्री प्रमोद भोवर ५७१ गुण (८७.८४ टक्के), व्दितीय गौरवी राजाराम कोचरेकर ५४८ गुण (८४.३० टक्के), शर्वरी भालचंद्र टाककर ५२९ गुण (८१.३८ टक्के), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा ९६.२९ टक्के निकाल लागला. या शाखेतून २७ पैकी २६ विद्यार्थी उतीर्ण झाले. या वि•ाागात प्रथम राकेश नंदकिशोर मांजरेकर ४८० गुण (७३.८५ टक्के), व्दितीय ओंकार आपा गावडे ४५३ गुण (६९.६९ टक्के), तर तृतीय नूतन सुनील तेंडोलकर हिला ४५२ गुण (६९.५४ टक्के ) गुण मिळाले आहेत.
शिरोडा गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.४४ टक्के
शिरोडा बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.९२ टक्के लागला आहे. या महाविद्यालयाच्या सायन्स शाखेचा निकाल ९७.७७ टक्के लागला आहे. या शाखेतून परिक्षेस बसलेल्या ९० पैकी ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मलाइका मॅक्सी फर्नांडिस ४९२ गुण (७५,६९ टक्के) मिळवून प्रथम आली आहे. कुणाल किरण कामत ४६१ गुण (७०.९२ टक्के) मिळवून द्वितीय तर मोहंमद मुस्तफा हयादसाब मकानदार ४४९ गुण (६९.०७) मिळवून तृतीय आला आहे.
या महाविद्यालयाच्या कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. या शाखेतून परिक्षेस बसलेल्या १२३ पैकी १२३ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन या शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. निखिल विलास बागकर ५५० गुण (८४.६१ टक्के) प्रथम, नेहा भगवान देवजी हिने ५४७ गुण (८४.१५ टक्के)द्वितीय तर गिरिश मंगेश कामत याने ५३२ गुण (८१.८४ टक्के) मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. महाविद्यालयाच्या कला शाखेतून परिक्षेस बसलेल्या ४३ पैकी ३४ विद्यार्थ्यी उत्तीर्ण होऊन या शाखेचा निकाल ७९.०६ टक्के एवढा लागला आहे. या शाखेतून दिप्ती रामचंद्र सारंग४७१ गुण (७२.४६ टक्के) प्रथम, हर्षदा परमानंद मालवणकर ४७० गुण (७२.३० टक्के) मिळवून द्वितीय तर सुस्मिता लक्ष्मण नाईक व नेहा आत्माराम बागकर या दोघांनी ४४८ गुण (६८.९२ टक्के) मिळवून संयुक्तरित्या तृतिय क्रमांक पटकाविला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एकुण परिक्षेस बसलेल्या ८६ पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९०.६९ टक्के लागला आहे. यामध्ये मनाली दिलीप पणशिकर हि ६०४ गुण (९२.९२ टक्के) मिळवून या विभागासह तालुक्यात प्रथम आली आहे. तर दिव्या दशरथ राणे ५६१ गुण (८६.३१ टक्के) द्वितीय व शिवानंद गोपाळ राणे ५४८ गुण (८४.३१ टक्के) मिळवून तृतीय आला आहे.

8

4