प्राजक्ता माने, प्रतीक्षा परब प्रथम : चित्रा ढवळ द्वितीय, ऋतिकेश सावंत तृतीय
कणकवली, ता.28 ः बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 94.05 टक्के लागला. शहरातील एस.एम.हायस्कूलच्या सायन्स शाखेची प्राजक्ता तानाजी माने आणि कळसूली हायस्कूलमधील कला शाखेची प्रतीक्षा प्रकाश परब यांनी 91.07 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक एम.एम.सावंत ज्युनिअर कॉलेज कनेडीमधील कॉमर्स शाखेची चित्रा अनंत ढवळ हिने 89.69 टक्के गुण मिळवून प्राप्त केला. तर तृतीय क्रमांक एस.एम.हायस्कूलच्या सायन्स शाखेचा ऋतिकेश बाळकृष्ण सावंत याने 88.03 टक्के गुण मिळवून प्राप्त केला आहे. इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुणाली गणपत पवार 88 टक्के (कणकवली कॉलेज) यांचा समावेश आहे. तालुक्यातील 18 कनिष्ठ महाविद्यालयामधून 2175 विद्यार्थी बारावी परीक्षेला बसले होते. पैकी 2058 उत्तीर्ण होऊन तालुक्यातील 94.62 टक्के इतका निकाल लागला. तालुक्यातील 4 कनिष्ठ महाविद्यालये तसेच त्यांच्या व्यवसाय अभ्यासक्रमाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.