मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.८६%

288
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आचरा न्यू इंग्लिश स्कूलची आस्था जाधव तालुक्यात प्रथम…

मालवण, ता. २८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मालवण तालुक्यातून या परीक्षेस १०४१ विद्यार्थी बसले पैकी ९९७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९५.८६ टक्के निकाल लागला आहे. यात न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या कला शाखेची विद्यार्थिनी आस्था जाधव हिने ८८.७७ टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. याच कनिष्ठ महाविद्यालयाच्या कोमल घाडी, रवीना पडवळ यांनी ५६२ गुणांसह द्वितीय तर चतुरा मालवणकर, पूजा शेवरेकर ५५९ गुणांसह यांनी तृतीय येण्याचा मान मिळविला आहे.
कनिष्ठ महाविद्यालय निहाय निकाल असा – एस. एन. ए. देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयातून ३०४ पैकी २९७ उत्तीर्ण होऊन ९८.०१ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर व्यवसाय अभ्यासक्रम परीक्षेसाठी ९२ पैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९०.२१ टक्के निकाल लागला आहे. कला- कृतिका जोगी (५३७), सिमरन मोंडकर (५३०) मारिया डिसोझा (५१९) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य- विराज गोवेकर (५३६), वासुदेव गोसावी (५३०), गौरव कदम (५२७) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. शास्त्र- उत्कर्षा कोलगावकर (५३४), सुनील पुजारे (५२५), रोशनी पाताडे (५२४) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. व्यवसाय अभ्यासक्रम- अंकिता बागवे (५११), सर्वेश गोठणकर (५०३), लीना गावडे (५००) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातून ५७ विद्यार्थी बसले पैकी ५० उत्तीर्ण होऊन ८७.७१ टक्के निकाल लागला आहे. कला- सुनीता काळे (४४९), तुषार जुवेकर (४२९), गुणेश गांगण (४२१) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य- सिद्धेश शर्मा (४५९), श्रुती पोफळे (४५६), हर्षद मिठबावकर (४५१) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. भंडारी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातून १२७ विद्यार्थी बसले पैकी १२६ उत्तीर्ण होऊन ९९.२१ टक्के निकाल लागला आहे. यात वाणिज्य व शास्त्र शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कला- ललिता खरात (५२०), अनुष्का बिरमोळे (५१४), अनंत सावंत (४८६) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य- भावना सारंग (५४३), प्रणाली मडये (५४०), कृतिका चव्हाण (५३६) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. शास्त्र- मनाली वेंगुर्लेकर (४४४) तेजस्विनी कांबळी (४१०), प्रसाद चौगुले (३९६) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वच सर्व ५६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे. कला- मयुरेश खोत (६८.३० टक्के), रश्मिता गावडे (62.92 टक्के), अक्षय परब (६० टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य- कल्पना परब (८१.३८ टक्के), प्रथमेश काळसेकर (७७.२३ टक्के), भावेश घाडी (७६ टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा कनिष्ठ महाविद्यालयातून १९४ विद्यार्थी बसले पैकी १९३ उत्तीर्ण होऊन ९९.४८ टक्के निकाल लागला आहे. यात वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कला- आस्था जाधव (५७७), अमृता सावंत (५३०), झिया शेख (५१५) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य- कोमल घाडी (५६२), रवीना पडवळ (५६२), चतुरा मालवणकर (५५९), पूजा शेवरेकर (५५९), प्रतीक्षा गोरवले (५५७) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वराड कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून २२ विद्यार्थी बसले पैकी १९ उत्तीर्ण होऊन ८६.३६ टक्के निकाल लागला. यात दामिनी गोसावी (७५.६९ टक्के), रिद्धी दळवी (७१.८४ टक्के), पल्लवी घाडी (७०.६१ टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ई. द. वर्दम कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून ४५ विद्यार्थी बसले पैकी ४४ उत्तीर्ण होऊन ९७.७७ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. वाणिज्य- श्रद्धा घाडीगावकर (४९८), मृणाल दुखंडे (४९६), अखिलेश परब (४४०) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. कला- लता माने (४६३), प्रज्ञा मेस्त्री (४४५), गजानन मराठे (३९०) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कट्टामधून १३४ विद्यार्थी बसले पैकी १२५ उत्तीर्ण होऊन ९३.२८ टक्के निकाल लागला आहे. कला- स्नेहा राणे (४८०), सायली काटकर (४६३), सोनाली कदम (४४८) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. वाणिज्य- दीप्ती गावडे (५२३), श्रुतिका परब (४९०), प्रीतम सावंत (४६५) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आर. पी. बागवे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातून २५ विद्यार्थी बसले पैकी १९ उत्तीर्ण होऊन ७६ टक्के निकाल लागला आहे. यात ओंकार मेस्त्री (४६८), दत्ताराम परब (४४४), सिद्धेश मेस्त्री (४३३) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. उच्च माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीमधून १३ विद्यार्थी बसले पैकी १३ उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे. जिज्ञासा सावंत (५५६), सायली साटविलकर (५४०), सविता जंगले (५२२) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

\