बांधकाम सभापतीपदी संजय कामतेकर, महिला व बालकल्याण सभापतीपदी उर्मी जाधव, आरोग्य,शिक्षण क्रीडा सभापतीपदी प्रतीक्षा सावंत
कणकवली, ता. 28 : कणकवली नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगरपंचायतीतील गटनेते नगरसेवक संजय कामतेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी उर्मी जाधव व आरोग्य, शिक्षण क्रीडा समिती सभापती पदी प्रतीक्षा सावंत यांची निवड झाली आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या विविध विषय समिती सभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दुपारी १ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. या कालावधीत तिन्ही विषय समिती सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तिन्ही सभापती पदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते यांनी जाहीर केले.
यावेळी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे , नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक अभिजित मुसळे, ऍड. विराज भोसले, अबीद नाईक, गणेश उर्फ बंडू हर्णे, मेघा गांगण , सुप्रिया नलावडे , कविता राणे आदी उपस्थित होते.तर विरोधी नगरसेवकांनी या निवडणुकी कडे पाठ फिरवली.त्यामुळे ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली
खा.राणेंचा विश्वास सार्थकी लावू-कामतेकर
खा.नारायण राणे ,माजी खा.निलेश राणे आम.नितेश राणे यांनी सभापती पदाची जबाबदारी देऊन जो आमच्यावर विश्वास वक्ते केला तो सार्थकी लावू,कणकवली पर्यटन दृष्ट्या पुढे नेताना अनधिकृत बांधकामावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया बांधकाम सभापती संजय कामतेकर यांनी दिली .