कुंब्रल सरपंचांचा राज्य आदर्श पुरस्काराने सन्मान

303
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग, ता. २९ तालुक्यातील कुंब्रल गावचे सरपंच प्रविण परब यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार नुकताच शिर्डी येथे साईबाबांच्या पुण्यनगरीत महाराष्ट्र सरपंच सेवा संघ यांच्या महाअधिवेशनात प्रधान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त सरपंच भास्कर पेरेपाटील,माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी,आदी उपस्थित होते यावेळी भूमाता ब्रिगेड राज्य अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  गेल्या कही वर्षापासून कुंब्रल गावच्या झालेला विकास पाहता त्यानी सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सरपंच प्रविण परब यांना शिर्डी येथे साईबाबांच्या पुण्यनगरी महाराष्ट्र सरपंच सेवा संघ यांच्या महाअधिवेशनातं प्रधान करण्यात आला.या मिळालेल्या पुरस्कारामुळे दोडामार्ग तालुक्यातून सरपंच परब यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे .