झिरंगवाडीत आग,आंबा व बांबू जळून खाक…

2

सावंतवाडी ता.२८: येथील झिरंगवाडी परिसरात आंब्याच्या बागेतील बांबूच्या बेटाला आग लावून आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले आहे.ही घटना आज सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान याबाबतची माहिती नगरपालिकेला मिळताच पालिकेच्या अग्निशमन बंब द्वारे ही आग विझवण्यात आली.
या आगीत आंब्याच्या चार ते पाच मोठ्या झाडांचे नुकसान झाले आहे.यात बांबूचे बेट पूर्णतः जळून खाक झाले.मात्र या आगीवर वेळीच नियंत्रण आणता आल्याने सुदैवाने इतर झाडांची नुकसानी टळली.

8

4