करुळ घाटात सुमारे ४०० फूट खोल दरीत कार कोसळली

212
2

अपघातात कार चालक जखमी; कारचा चक्काचूर

वैभववाडी, ता. २९ : करुळ घाटात चालकाचा ताबा सुटून कार सुमारे ४०० फूट दरीत कोसळली. कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात चालक स्वप्नील रामचंद्र भट्ट वय ३२ रा.मुलुड मुंबई जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११.३०.वा.सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, कार चालक स्वप्नील भट्ट हा एकटाच आपल्या ताब्यातील कार घेऊन कोल्हापूरहून कणकवलीला जात होता. गगनबावड्यापासून सुमारे दोन कि.मी.अंतारावर विश्रांती स्थळानजीक एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कार सुमारे ४०० फूट दरीत कोसळली.दरम्यान २०० फूट अंतरावर चालक गाडीतून बाहेर फेकले गेले. यात ते जखमी झाले आहेत.त्याला स्थानिकाने दरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय गगनबावडा येथे दाखल केले. अपघाताची खबर मिळताच वैभववाडी स.पो.नि.दत्ताञय बाकारे, पो.ह.राजू जामसंडेकर, पुरकर चालक कदम यांनी घटना स्थळी धाव घेतली.या गाडीत अन्य कोणी प्रवाशी अथवा काही सामान आहे का? याची खाञी करण्यासाठी करुळ येथील स्थानिक तरुणांच्या सहकार्याने दरीत उतरुन पहाणी केली.त्यात अन्य कोणी व्यक्ती आढळली नाही.यासाठी करुळ येथील हेमंत पाटील, हिंदूराव पाटील, अनंत माळकर, मनोहर , रामकृष्ण पाटील, राजेंद्र वारंग, मंगेश शिवगण, रत्नकांत राशीवडे यांनी यात मदत केली.करुळ घाटात अपघात झाल्यास करुळ येथील हे युवक अपघातातील जखमींच्या नेहमीच मदतीला धावतात.

4