दोडामार्गात पुन्हा एकदा टस्कराचा धुमाकूळ

2

घाटीवडे-बांबर्डेतील घटना : केळी व सुपारीची झाडे जमिनदोस्त

दोडामार्ग, ता. 29 : येथील घाटीवडे-बांबर्डे परिसरात पुन्हा एकदा टस्कराने थैमान घालत केळी व सुपारीच्या झाडांचे नुकसान केले आहे. हा प्रकार काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला. यात रमेश ठाकूर, तातोबा देसाई, रामराव देसाई यांच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पंधरावड्यापूर्वी दोडामार्ग तालुक्यात टस्कराने बागायतीचे नुकसान केल्याची घटना घडली होती. दरम्यान काही दिवस हा टस्कर दिसून आला नव्हता. आता पुन्हा एकदा त्याने या परिसरात आपला मोर्चा वळविला आहे. यात मोठ्या प्रमाणात केळी व सुपारीची झाडे त्याने जमिनदोस्त केली आहेत. याबाबतची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे श्री. मुखाडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

4