कुडाळ ता.३०: तालुक्यातील नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव १ व २ जून रोजी संपन्न होत आहे.एक वर्ष आड येणाऱ्या या जत्रोत्सवासाठी सिंधुदुर्गासह कर्नाटक व गोवा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात.यावर्षी प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस देवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात शनिवारी सायंकाळी ६:०० वा. देवाचा मुखवटा सुद्रिक यांच्या घरातून मुख्य सभामंडपात आणला जाणार आहे.रात्री ९:०० वा. सर्व मानकरी बहु मानकरी व ग्रामस्थ जमा झाल्यानंतर देवाचा मुखवटा संचार परिधान करून मुख्य सभामंडपातून महालक्ष्मी मंदिराकडे नेऊन तिथे खेळ झाल्यानंत संचार पुन्हा सभा मंडपाकडे येणार आहेत.
मुख्य कार्यक्रम २ जून रोजी दुपारी १ वाजल्यापासून सुरू होणार असून ३ वाजता या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.तरी भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
कुडाळ-नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव १ व २ जून रोजी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES