वेंगुर्ला-परबवाडा सरपंचांना आदर्श पुरस्काराने सन्मानित…

219
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता. ३०
सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार वेंगुर्ला-परबवाडा गावचे सरपंच श्री.विष्णु उर्फ पप्पू परब यांना शिर्डी येथील अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त सरपंच भास्कर पेरेपाटील, माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी आदीसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी भूमाता ब्रिगेड राज्य अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते श्री. परब यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परबवाडा गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कडून सुरू असलेल्या कामाची पोचपावती मिळाली असे श्री. परब यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे वेंगुर्ला तालुक्यातून व परबवाडा गावातून सरपंच श्री.विष्णू उर्फ पप्पू परब यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

\