नवोदय विद्यालयासाठी अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड

166
2
Google search engine
Google search engine

 

वैभववाडी : नवोदय विद्यालयामार्फत आयोजित सन-२०१९ या वर्षीचा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी तालुक्यातून अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. आयुष अविनाश आंधळे व कु. वेदिका विवेकानंद कडू या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व शिक्षक तसेच वर्गशिक्षक एम.एस. चोरगे बाह्य परीक्षा प्रमुख पी. बी. पवार यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे, विस्तार अधिकारी मुकुंद शिनगारे व वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई चे अधिक्षक जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी. एस. नादकर, ज्येष्ठ शिक्षक एस. बी. शिंदे यांनी अभिनंदन केले व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.