कालावल खाडीपत्रात ‘सी २’ गटामध्ये अनधिकृत वाळू उतखनन

187
2
Google search engine
Google search engine

मसुरे,ता.३०: कालावल खाडी पात्रातील ‘सी २’ या वाळू गटा मध्ये अनधिकृत वाळू उतखनन होत असल्याचे निवेदन मसुरे येथील ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी केले आहे. सी २ या लिलावाची मुदत २९ मे रोजी संपली आहे. लिलावाच्या मुदत संपून सुद्धा कालावल व तेरई येथील वाळू व्यावसाईक २० पेक्षा जास्त होड्या द्वारे अनधिकृत वाळू उतखन्नन करत आहेत. सदर वाळूची वाहतूक कालावल व तेरई भागातून होत आहे. महसूल तसेच मेरिटाईम बोर्डाने तातडीने कारवाई करण्याची मागणी अनिल मसुरकर यांनी केली आहे.