शिरोडा हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधीलकीचे दर्शन

2

वेंगुर्ला, ता.३०: तालुक्यातील शिरोडा येथील गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयाच्या इयत्ता सन १९८८-८९ मधील १० वी. बॅच विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केल. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून या विद्यार्थ्यांनी शिरोडा गावातील उपजिल्हा रुग्णालयास चाळीस बेडशीट भेट दिल्या.
शाळेच्या किलबिलाटा नंतर मोठे होत आपल्या विश्वात रममाण असताना शिरोडा हायस्कुलच्या १९८८-८९ च्या दहाविच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रथम दहाविपर्यंत शिक्षण घेतलेल्या बावडेकर विद्यालयास भेट दिली. या निमित्त सर्वांच्या भेटीगाठी व मौजमजा करण्याबरोबर सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून सामाजिक बांधिलकी या नात्याने सर्व रुग्णालयास बेडशीट भेट दिल्या. या स्नेहसंमेलना बरेच माजी विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिवस सोबतीने मौजमजा केली.

6

4