बबन साळगावकरांचे राष्ट्रवादी प्रवेशाबाबत “वेट अँड वॉच”…

2

पत्रकार परिषदेत भूमिका; विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली त्यात गैर काय..?

सावंतवाडी, ता.३१: प्रत्येक कार्यकर्त्याला मोठे व्हायचे असते,त्यामुळे विधानसभेची इच्छा व्यक्त केली,तर त्यात गैर काय असा पलटवार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मी नेते मानतो.मात्र त्यांच्या सोबत जाणार का याबाबतच्या भूमिकेबाबत ’वेट अँड वॉच’ असे सांगुन त्यांनी अधिक बोलणे टाळले.नगराध्यक्ष बबन साळगावकर की पालकमंत्री दीपक केसरकर असा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्ही केसरकरांसोबत रहा अशी भूमिका मी यापूर्वीच कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे.त्यामुळे माझ्या सोबत कोणी यावे असा आग्रह मी धरणार नाही.
श्री.साळगावकर यांना राष्ट्रवादीमधून ऑफर आहे.अशी गेले काही दिवस चर्चा आहे.या विषयावरून श्री.साळगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत छेडले असता ते म्हणाले,मी गेले ३५ ते ३६ वर्षे राजकारणात प्रामाणिकपणे काम करत आहे.त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त केली तर त्यात गैर काय.मी राजकारणात शरद पवार,यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानतो.परंतू शरद पवार यांच्यासोबत काम करायला मला आवडेल.सद्यस्थितीत राष्ट्रवादी अडचणीत आहे.अशा परिस्थितीतसुद्धा मी त्यांच्यासोबत राहीन,यात काही शंका नाही.असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,अनारोजीन लोबो,नगरसेवक बाबू कुडतरकर,सुरेंद्र बांदेकर,शुभांगी सुकी,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

9

4