मुंबई, ता. 31 ः मोदींच्या मंत्रीमंडळात सिंधुदुर्गचे सुपुत्र अरविंद सावंत यांना अवजड उद्योग मंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे. तर नितीन गडकरी यांना भुपुष्ट वाहतूक महामार्ग सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे खाते देण्यात आले आहे.
काल मोदींच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज सकाळी खातेवाटप करण्यात आले. यात राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण तर अमित शहा यांच्याकडे गृहखाते देण्यात आले आहे. प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण आणि वने, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे आणि वाणिज्य, रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा, रामदास आठवले सामाजिक न्याय, संजय धोत्रे यांच्याकडे दुरसंचार, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान आदी खाती देण्यात आली आहेत. तर गोव्याचे श्रीपाद नाईक यांच्याकडे आयुष्य, संरक्षण राज्यमंत्री या खात्याचा पदभार देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गचे सुपुत्र अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग खाते
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES