बांदा टोलनाका उत्खनन प्रकरणी कंपनीला कारणे दाखवा नोटीस

218
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तहसिलदारांकडून कार्यवाही : दंड वसूल का करू नये याचा मागितला खुलासा

बांदा, ता 31 : येथील टोलनाका परिसरात चुकीच्या पद्धतीने झालेल्या उत्खननानंतर संबंधित कंपनीला तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी आज कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. झालेल्या उत्खननाबाबत येत्या सात दिवसात योग्यतो खुलासा द्या अन्यथा दंडात्मक वसुलीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी महसूल व खनिकर्म विभागाकडे केली होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने उत्खनन झाले आहे. हा सर्व प्रकार तहसिलदार कार्यालयाकडून करण्यात आलेल्या तपासणी अहवालात उघड झाला होता. या अहवालात अंदाजे 2 लाख 12 हजार 962 ब्रास मातीचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व प्रकार अनधिकृतरित्या करण्यात आला असून त्यासाठी कोणाचीही रितसर परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना करण्यात आलेल्या उत्खननाच्या दंडापोटी वसुली का करण्यात येऊ नये असे पत्र संबंधित कंपनीला देण्यात आले आहे.

\