नाणोस सरपंच बाळकृष्ण जोशी आदर्श पुरस्काराने सन्मानित…

2

सावंतवाडी ता.३१: तालुक्यातील नाणोस गावचे सरपंच वासुदेव बाळकृष्ण जोशी यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्यां व भुमाता ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक प्रमुख तृप्ती देसाई यांच्या हस्ते देण्यात आला.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य (ता.संगमनेर जि.अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आर्दश सरपंच पुरस्कार सोहळा नुकताच शिर्डी येथे संपन्न झाला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सरपंचाना हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

15

4