मनसेच्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

166
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ३१ : मालवण तालुका मनसेच्यावतीने दांडी शाळा येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात १२५ जणांनी सहभाग दर्शविला.
शिबिराचे उद्घाटन उद्योजिका सुचिता वायंगणकर यांच्या हस्ते झाले. हृदय व मेंदूच्या रक्त वाहिन्यांची कार्यक्षमता, लिव्हरची कार्यक्षमता, पचन संस्थेची कार्यक्षमता, पित्ताशय, स्वादूपिंड, मूत्रपिंड, फुफ्फुस, हाडांचे विकार, हाड खनिज विकार, हाडांचे आरोग्य, ह्यूमन टॉक्सिन, लठ्ठपणा, बेसिक फिजिकल थेरपी, ब्लड शुगर, जीवनसत्त्व, अमिनो अ‍ॅसिड, को एंजाईम्स, अंतःस्राव प्रणाली, रोग प्रतिकार प्रणाली, रक्तातील हेवी मेटल, डोळ्यांचे आरोग्य, अ‍ॅलर्जी, त्वचा व त्वचा संबंधित घटक, शरीररचना विश्‍लेषण, मासिक पाळी, पांढर्‍या पेशी कोलजन मॅट्रिक्स, हृदय व मेंदूच्या पल्स, चॅनल्स आणि कोलटरल्स, रक्तातील चरबीचे प्रमाण, मोठ्या आतड्यांचे प्रमाण, थायरॉईडची कार्यक्षमता, कॉम्प्रिहेंसिव्ह रिपोर्ट, मेल सेक्शुअल रिपोर्ट, धातू, प्रोस्टेट, स्त्रियांकरिता, गायनेकोलॉजी, स्तनांचे विकार आदी प्रकारच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या.
यावेळी तालुका संपर्क अध्यक्ष राजू साटम, तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर शैलेश अंधारी, विल्सन गिरकर, भारती वाघ, मुख्याध्यापक शिवराज सावंत, डॉ. रघुनाथ गावडे, आनंद तावडे, सुमीत मौर्या, अक्षय नेरुरकर, नेहा जाधव आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी आबा आडकर, हर्षल मालंडकर, गुरू तोडणकर यांनी मेहनत घेतली.

\