वेंगुर्लेची तन्वी नाईक कोल्हापूर ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम

575
2

वेंगुर्ले,ता. ३१ : वेंगुर्लेची कन्या कु.तन्वी शैलेन नाईक हिने बारावी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवित कोल्हापूर येथील संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजमध्ये ती प्रथम आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च २०१९ मध्ये बारावी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत वेंगुर्ले येथील कु.तन्वी नाईक हिने वाणिज्य शाखेतून ६५० पैकी ६११ गुण मिळवित कोल्हापूर येथील घोडावत ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.  कु. तन्वी ही वेंगुर्ले येथील सिमेंट विक्रेते शैलेन नाईक यांची कन्या होय. तन्वीच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

4