भोसले नॉलेज सिटीचा ‘वैभव”ला पावणे तीन लाखाची नोकरी

287
2

223 विद्यार्थ्यांना संधी : संस्थेकडून अभिनंदन

सावंतवाडी, ता. 2 : येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉलिटेक्निकलचे शिक्षण घेता येईल. 223 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये बड्या पगाराची नोकरी मिळाली आहे. यात वैभव बर्वे या विद्यार्थ्याला एलएनडी कंपनीत वार्षिक 2 लाख 83 हजाराचे वेतन मिळाले आहे.
महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी देण्यात येते. 2016-17 मध्ये 61 विद्यार्थ्यांनी तर 2017-18 मध्ये 118 विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. यावर्षी ही संख्या दुपटीने वाढली आहे. 223 विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून आणखीही काही विद्यार्थ्यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. हे विद्यार्थी महिंद्रा, टाटा, सिपला, बजाज, किर्लोसकर, रिलायन्स अशा विविध कंपन्यात आज कार्यरत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

4