घोगळे कुटुंबियांचे घर सावरण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

2

महिला पदाधिकाऱ्यांची माहिती : घर पडण्यामागे बिल्डर असल्याचा आरोप

सावंतवाडी, ता. 3 : घर मालकिच्या वादातून खासकिलवाडा येथे जयवंत घोगळे यांचे पाडलेले घर अखेर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन पूर्ण करून दिले आहे. काल घराचे तात्पुरते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेतली व या प्रकारामागे शहरातील एक बिल्डर असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच अशा प्रकारचे हल्ले खपवून घेेतले जाणार नाही असा इशारा यावेळी दिला. यावेळी अनारोजीन लोबो, निता कविटकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, प्रज्ञा कोठावळे, कमला मेमन, रश्मी माळोदे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.
तीन दिवसापूर्वी मालकिच्या वादातून घर पाडण्याचा प्रकार झाला होता. तसेच वृद्धेसह चार लोकांना मारहाण झाली होती. त्यानंतर त्या कुटुंबाला सावरण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली व त्यांनी पुढाकार घेऊन काल घर पूर्ववत बांधून दिले. यावेळी सागर नाणोसकर, सुधन आरेकर, प्रशांत कोठावळे आदींनी सहकार्य केले.

4