डॉक्टर उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलेने केली स्वतःच्या हाताने प्रसूती…

2

नागपूर येथील प्रकार ; चौकशी करण्याचे पालकमंत्री बावनकुळे यांचे आदेश…

नागपूर, ता.०३ : मध्यरात्री रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे गर्भवती महिलेला स्वतःच्या हाताने प्रसूती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही घटना येथील एका शासकीय रुग्णालयात मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली.सुकेशनि चेतानी असे त्या महिलेचे नाव आहे.
या प्रकाराच्या चौकशीची मागणी स्थानिकाकडुन करण्यात आली.त्यानुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीसाठी तीन सदस्यांचे पथक नेमले असून तीन दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
काल मध्यरात्री त्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतु तिची प्रसूती होत नसल्यामुळे डॉक्टर तेथून निघून गेले.मात्र पहाटे ५ च्या सुमारास तिला पुन्हा कळा सुरू झाल्या.तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या वार्ड मधील एक महिला त्या ठिकाणी धावून आली.परंतु तत्पूर्वीच त्या महिलेची प्रसूती झाली होती.दरम्यान चार तास त्या महिलेला बाळासह जमिनीवरच झोपावे लागले.

7

4