कांदळगाव उपसरपंचपदी आनंद आयकर यांची बिनविरोध निवड…

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणेंच्या माध्यमातून गावचा विकास साधणार : आनंद आयकर…

 

मालवण, ता. ३ : कांदळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत आनंद आयकर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच उमदी परब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली.
कांदळगाव ग्रामपंचायत उपसरपंच रणजित परब यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने गेले दोन महिने ग्रामपंचायत उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी आज कांदळगाव ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी आनंद ऊर्फ बाबल आयकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक ए. बी. पेठे यांनी ही बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी सभापती सोनाली कोदे, माजी सभापती उदय परब, सरपंच उमदी परब, बाबू राणे यांनी उपसरपंच आनंद आयकर यांचे अभिनंदन केले. यावेळी सदस्य श्रद्धा कुंभार, अक्षता परब, माधवी कदम, बाबू राणे, कृषी सहाय्यक चुंबळकर, दादा परुळेकर, आशिष आचरेकर, गजानन सुर्वे यासह अन्य उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यांनी जी जबाबदारी दिली ती सार्थ ठरविणार आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच आनंद आयकर यांनी सांगितले.

\