दोडामार्ग ग्रामस्थांची मागणी : सोनावल गावात मोठ्या प्रमाणात नुकसान
दोडामार्ग / महेश लोंढे, ता. 3 : तालुक्यात गेले काही दिवस स्थिरावलेल्या जंगली हत्तींनी काल रात्री सोनावल गावातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यात केळी व नारळाच्या झाडाचा समावेश आहे.
दरम्यान वारंवार होणार्या नुकसानीला शेतकरी कंटाळले असून नुसते पंचनामे करण्याऐवजी हत्ती पकड मोहिम राबवा अशी मागणी करण्यात आली आहे.
काल सोनावल गावात हत्तींनी मोठ्या प्रमाणात केले. रात्री त्या ठिकाणी स्थिरावलेल्या हत्तीचा कळप बिनधिक्कत फिरत असल्यामुळे ग्रामस्थात भितीचेे वातावरण आहे. नुकसानीची आकडेवारी वाढत असताना जिवीतहानी होण्याची शक्यता असल्याने हत्तींना पकडा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.