करुळ येथे टेंम्पोला अपघात…

2

अपघातात टेंम्पो चालक सुदैवाने बचावला

वैभववाडी, ता. ३ : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने करुळ जिल्हा बँकनजिक पुलाच्या कठड्याला टेंम्पोची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात टेंम्पो चालक सुदैवाने बचावला आहे. तर टेंम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद उशिरापर्यंत वैभववाडी पोलिसात करण्यात आली नव्हती.
बेकरीचा माल घेऊन सदर टेंम्पो वैभववाडीला आला होता. माल उतरवून वैभववाडीहून कोल्हापूरला जात असताना सोमवारी दुपारी ११ वाजता करुळ येथे अपघात झाला. सदर अपघातातील टेंम्पो नदी पात्रात कलंडला असता मोठा अनर्थ घडला असता अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. टेंम्पो चालक यांना ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला.

1

4