सिंधुदुर्गनगरी, ता. ४ : राज्यातील अनेक भागात ठाण मांडून बसलेल्या पाणी टंचाई आणि दुष्काळाशी लढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र शासन अतिशय महत्वाचे कार्य करीत आहे. या अंतर्गत प्रत्येकजण आपापल्या परीने कार्यभार स्वीकारत असतो.जेणे करून आपल्या सर्वानाच पाण्याचे महत्त्व कळेल आणि पाणी वाचवण्यासाठी मदत होईल. याचा उद्देशाने ५ जून रोजी मालवण तालुक्यातील आमडोस येथे महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ड्रोन एज हि एक पर्यावरण संरक्षण संस्था आहे. ड्रोन विषयीची माहिती आणि त्याचे उपयोग सामाजिक कार्यासाठी कसे करावे ह्यासाठी कार्यरत आहे. ५ जून २०१९ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त मालवण तालुक्यातील आंबडोस गावात ड्रोनचा आणि ए आय चा वापर करून पाणी आणि त्याचे स्रोत याचे फोटो आणि विडिओ माहिती जमा करून त्यावर संशोधन करून पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करणार आहेत. हि संस्था त्याच गावातील होतकरू तरुण वर्ग यांना ड्रोन प्रशिक्षण देणार आहे. हि संस्था पाणी संवर्धन आणि त्याचे महत्व या विषयी माहिती गावातील लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
या संस्थेसोबत भ्रमर सामाजिक संस्था ठाणे, ड्रोन लॅब अहमदाबाद, इंडिया फ्लाईन्ग लॅब, स्कायमोशन मुंबई या अशा अनेक संस्था या कामात हातभार लावणार आहेत.
मुंबई मधून स्काय मोशन, ड्रोन एज, इंडिया फ्लाईन्ग लॅब आणि भ्रमर संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरवले आहे. दरवर्षी साजरा होणार जागतिक पर्यावरण दिन याचे औचित्य साधून आमडोस येथे जाऊन ग्रामस्थांसोबत महाश्रमदान या उपक्रमात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलणार आहोत. ‘संकल्प महाश्रमदानाचा, तुमच्या आमच्या उज्वल भविष्याचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक बांधीलकीतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात सहभागी व्हा. तसेच अधिक माहितीसाठी भ्रमर संस्था, ठाणे
अनुप मालंडकर मो.९०२९३७००३१ यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमडोस येथे ५ जून रोजी पाण्यासाठी महाश्रमदान सोहळा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES