सावंतवाडी पदाधिकार्यांची भूमिका : तुर्तास पालिकाच करणार खर्च
सावंतवाडी, ता. 4 : येथील नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या बालवाड्या शासनाकडे वर्ग न करण्याचा निर्णय पालिका पदाधिकार्यांनी घेतला आहे. पालिकेच्या माध्यमातून या बालवाड्या विकसीत करू असा विश्वास पदाधिकार्यांना आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या ताब्यात शहरातील चार बालवाड्या आहेत. या बालवाड्या शासनाकडे वर्ग करण्यात याव्यात असा शासन निर्णय पालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र तुर्तास तरी या निर्णयाला पालिकेने नकार दिला आहे. काल या ठिकाणी झालेल्या मासिक सभेत या विषयावर चर्चा झाली. यावेळी पालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकणार्या मुलांना सोईसुविधांसह शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे बालवाड्या पालिकेच्याच ताब्यात ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.