मध्यरात्रीची घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल
कणकवली, ता.04 : किरकोळ कारणावरून शहरातील तिघा तरुणांनी व्यापारी जगन्नाथ उर्फ बाबू विजय वळंजू यांना मारहाण केल्याची घटना रात्री 11.50 च्या दरम्यान या तिघांविरोधात श्री.वळंजू यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सिद्धेश पिल्लाई, अनिकेत चव्हाण, पराग सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बांदा येथे काजू व्यापार करून बाबू वळंजू काल रात्री 11.50 च्या दरम्यान कणकवलीत आले होते. तेलीआळीतून ते आपल्या घराच्या दिशेने जात असताना तिघे तरूण रस्त्यावर उभे होते. त्यांना रस्त्यावरून बाजूला व्हा असे बाबू वळंजू यांनी सांगितले. तिघे तरूण बाजूला होताच वळंजू याने गाडी पुढे घेतली. मात्र आपल्याला बाजूला व्हा असे सांगितल्याच्या रागातून सिद्धेश पिल्लाई याने दुचाकी कारच्या पुढे नेली. त्यामुळे वळंजू याने गाडी थांबवली ते गाडीतून बाहेर पडत असतानाच पिल्लाई याने गाडीच्या दरवाजावर लाथ मारली. यात वळंजू यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रस्त्यालगतच्या सिमेंटचा तुकडाही फेकून मारला. वळंजू यांनी तो चुकवला. यात गाडीची काच फुटली. यानंतर सिद्धेश पिल्लाई याच्यासमवेत पराग सावंत आणि अनिकेत चव्हाण यांनीही मारहाण केली. गाडीच्या दरवाजावर लाथा मारल्या. फिर्याद बाबू वळंजू यांनी पोलिसांत दाखल केली. या घटनेत वळंजू यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिघा आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे