Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादोडामार्गात जिओ केबल खोदाईचे काम रोखले

दोडामार्गात जिओ केबल खोदाईचे काम रोखले

शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा बांधकाम विभागाला घेराओ

दोडामार्ग ता.०४: शहरात पावसाच्या तोंडावर जिओ केबल टाकण्यासाठी सुरू असलेले खोदकाम रोखण्यासाठी सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर घेराओ घातला.यावेळी बांधकामच्या अधिकाऱ्यांनी सुरू असलेले काम पोलिस बंदोबस्तात बंद पाडले.जोपर्यंत विजघर ते दोडामार्ग पर्यंतची साईडपट्टी पाणी मारून व त्यावर रोलर फिरवून मजबूत केली जात नाही.तोपर्यंत काम करू देणार नाही.असा इशारा यावेळी सेना-भाजपा कडून देण्यात आला आहे..
जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी लागणारी ओएफसी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्याचे काम सध्या सुरु आहे. विजघर ते दोडामार्ग असे खोदकाम करण्यात आले असून शहरातील खोदकाम करणे बाकी होते. पंधरा दिवसांपूर्वी सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी हे काम बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. याबाबतची माहिती सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळताच सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, आनंद रेडकर , कसई-दोडामार्गचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण , भाजपाचे शहराध्यक्ष योगेश महाले, रंगनाथ गवस , समीर रेडकर , भगवान गवस आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत शहरात पावसाच्या तोंडावर सुरू असलेले खोदकाम बंद पाडण्याची मागणी केली. एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. मात्र कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने चेतन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्याची भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली असता. त्यांनी कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात सुरू असलेले खोदकाम बंद पाडण्यात आले.
यावेळी दोडामार्ग ते वीजघर अशी खोदकाम करताना उघडलेली साईडपट्टी पाणी मारून व रोलर फिरवून पूर्ववत करण्यात यावी. तसेच शिल्लक राहिलेले खोदकाम पावसाळ्यानंतर करण्यात यावे अशी मागणी सेना-भाजपा कडून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments