Saturday, November 2, 2024
Google search engine
Homeकोंकण पर्यटनपार्कींगची सुविधा नसल्याने पर्यटकांना घ्यावा लागला रस्त्यांचा आधार...

पार्कींगची सुविधा नसल्याने पर्यटकांना घ्यावा लागला रस्त्यांचा आधार…

हंगामातील शेवटच्या टप्प्यात पर्यटकांचा वाढला लोंढा ; पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

मालवण, ता. ४ : उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास आज येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. बंदर जेटी येथील पार्किंग क्षेत्र वाहनांनी भरून गेल्याने अन्य पर्यटकांना आपली वाहने लावण्यासाठी रस्त्यांचा आधार घ्यावा लागला. यात फोवकांडा पिंपळ ते बंदर जेटी परिसरातील रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी भरून गेले होते. शहरात अन्यत्र पार्किंगची सुविधाच नसल्याने बर्‍याच पर्यटकांची गैरसोय झाली.
बंदर विभागाने २५ मे पासून किल्ले प्रवासी होडी वाहतूकीसह सर्व प्रकारच्या जलक्रीडा प्रकारांना बंदीचे आदेश दिले. त्यामुळे किल्ले प्रवासी होडी वाहतूक तसेच जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्यात आले. मात्र पर्यटकांचा ओघ वाढताच राहिल्याने नाइलाजास्तव पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक अनधिकृतरीत्या सुरू आहे. किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने बंदर विभागाकडे मुदतवाढीची मागणी केली. मात्र बंदर विभागाने मुदतवाढ न दिल्याने अनधिकृतरीत्या प्रवासी होडी वाहतूक सुरू आहे.
पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. आज शहरात दाखल झालेल्या पर्यटकांमुळे बंदर जेटी परिसर गर्दीने फुलून गेला होता. बंदर जेटीच्या ठिकाणचे पार्किंग क्षेत्र पर्यटकांच्या वाहनांनी पूर्णतः भरले होते. त्यामुळे अन्य पर्यटकांना बंदर जेटीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करावी लागत होती. काही पर्यटकांना तर आपली वाहने उभी करण्यास जागाच उपलब्ध न झाल्याने त्यांना गैरसोयीचा फटका बसला. त्यामुळे पर्यटन हंगामात पार्किंग प्रश्न गंभीर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments