मंत्रिमंडळ बैठकीत अधिनियमात सुधारणा : भाजपचे मंत्री, पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश…
रत्नागिरी, ता. ०४ : येथील शिरगाव मत्स्य विद्यालय हे कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न होते. न्यायालयात केलेल्या याचिकेमुळे हे मत्स्य विद्यालय नागपूर येथील म्हापसू मत्स्य विद्यापीठाशी संलग्न करण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते. हा आदेश रद्द व्हावा व तातडीची अधिसुचना काढून योग्य निर्णय घ्यावा अशी सरकारला सुचना केली होती. त्यानुसार सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठ हे अधिनियम महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा केली. त्यामुळे हे मत्स्य विद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत न होता कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत राहणार आहे.
या निर्णयामुळे पदवीधर विद्यार्थ्यांची पदवी अवैध ठरण्याची भिती दूर झाली आहे. हा मोठा निर्णय असून याचा पाठपुरावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी विनोद तावडे यांच्याकडे केला होता. याला आज यश मिळाले. हा निर्णय आज राज्यपालांकडे जाईल. निर्णयावर सही होवून तो मंत्रीमंडळात ठेवून त्याचे कायद्यात रुपांतर करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली. सतत पाठपुरावा करणार्या लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, विद्यापीठाचे सर्व कर्मचार्यांचा हा विजय आहे असे त्यांनी सांगितले.