सौ. गीतांजली सातार्डेकर यांना महाराष्ट्र टॅलेंट लोकरत्न पुरस्कार प्राप्त

2

दोडामार्ग, ता. ०४ : दोडामार्ग तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा, सोनावलमधील पदवीधर शिक्षिका सौ. गीतांजली संतोष सातार्डेकर यांना बायना-वास्को, गोवा येथील रवींद्रभवनमधील एका शानदार कार्यक्रमात नुकताच ‘महाराष्ट्र टॅलेंट लोकरत्न पुरस्कार’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग -गोवा या संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून वास्को-गोवा या ठिकाणी आशियाई कला, साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ‘कौतुक सन्मानाचा …. सन्मान प्रतिष्ठेचा ….’ या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्ये करणाऱ्या मान्यवरांचा आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आतापर्यंत सौ. सातार्डेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा यांतील चौफेर कार्याबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले आहे. आपले संपूर्ण आयुष्य आदिवासींसाठी समर्पित करणाऱ्या ऋषितुल्य अशा पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे या आदरणीय दाम्पत्याच्या हस्ते सौ. सातार्डेकर यांना महाराष्ट्र टॅलेंट लोकरत्न अवॉर्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली सव्वीस वर्षे शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या सौ. सातार्डेकर या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचे वेगळेपण राखले आहे. इतकेच नव्हे तर त्या एक साहित्यिक असून समाजाचे डोळसपणे निरीक्षण करून आपल्या कथा, लेख, कविता यातून समाजाचे प्रतिबिंब दाखवण्याची त्यांची धडपड प्रशंसनीय आहे. तसेच त्या आपल्या विद्यार्थ्यांमधील साहित्यिक गुण हेरून त्यांनाही प्रोत्साहित करण्यासाठी विविधांगी उपक्रमांचे आयोजन करत असतात. शिवाय सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे कार्य दखल घेण्यायोग्य आहे. त्या स्वतः एक खेळाडू आहेतच शिवाय महिला कबड्डी राज्यपंच म्हणूनही क्रीडाक्षेत्रात त्यांनी जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये पंच म्हणून यशस्वी भूमिका पार पाडत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शन करून त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत व घडवत आहेत.
सामाजिक बंधीलकीचे भान राखून सर्व क्षेत्रामध्ये मौलिक योगदान देणाऱ्या या बहूआयामी व्यक्तिमत्वाचा डॉ. आंमटेसारख्या दाम्पत्याच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान होणं, हे निश्चितच त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सौ. गीतांजली सातार्डेकर यांना महाराष्ट्र टॅलेंट लोकरत्न पुरस्कार प्राप्त

दोडामार्ग प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील जि.प. केंद्रशाळा, सोनावल मधील पदवीधर शिक्षिका सौ. गीतांजली संतोष सातार्डेकर यांना बायना- वास्को, गोवा येथील रवींद्रभवन मधील एका शानदार कार्यक्रमात नुकताच ‘महाराष्ट्र टॅलेंट लोकरत्न पुरस्कार’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

7

4